जोशीबाईंना आफ्रिकन जोशी हे नाव का होतं ते आज कळलं. आपल्या शाळेत 68 च्या सुमारास join करण्याआधी त्या आणि त्यांचे mr एथिओपियात 3 वर्षे शिक्षक होते. त्यामुळे इथे आल्यावर त्यांची ओळख तशी झाली.
पण बाईंची स्मरणशक्ती मानली. त्यांचा आवाज अजूनही तसाच खणखणीत आहे. बोलणं अगदी स्पष्ट. वयाची 80 वर्ष उलटल्यावरही इतकी सुस्पष्टता खरंच वाखाणण्यासारखी.गेल्या मे महिन्यात झालेल्या operation मुळे बिछ्यान्यात आहेत पण आपले आपण स्वतःचे सगळे करतात. आणि आतापर्यंत अगदी active होत्या. retirement नंतर पौरोहित्य शिकून ते सुद्धा करायच्या.
आपल्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यात. आपल्या योजनांसाठी मार्गदर्शनाचे आश्वासनही दिले आहे.
देव त्यांना या पुढील आयुष्य शांत आणि आरोग्यपूर्ण देवो हिच सदिच्छा.